भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रमौली यांना ‘हरित औष्णिक ऊर्जा’ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रमौली यांना ‘हरित औष्णिक ऊर्जा’ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्बन डायऑक्साइडचे संग्रहण करून त्याचे औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त रसायनांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावित प्रयोगाने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संघाला एक्स-प्राइज कार्बन रिमूव्हल ग्रँड प्राइज स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवीन अल्गोरिदम वापरून बिनतारी संदेशवहन यंत्रणेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यात संशोधकांना यश
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी सिक्कीममधील अती उंचीवरील ठिकाणी हायब्रिड स्टोरेज सिस्टीम असलेल्या सौर मायक्रोग्रिड्सची स्थापना केली.
तीव्र जलावरोधक पृष्ठभागावरून पाणी कसे वाहते याचा संशोधकांनी अभ्यास केला.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील स्थापत्य विभागात कार्यरत, प्राध्यापक सुबिमल घोष यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) पुरस्कृत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१९ जाहीर झाला आले. भूपृष्ठावरील प्रक्रियांचा भारतीय पर्जन्यमानावर कसा प्रभाव पडतो तसेच क्षेत्रीय पर्जन्यमान आणि त्याचा अंदाज अचूकपणे वर्तविण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
बॅंकेच्या व्यवहारांपासून, संरक्षण, संनिरिक्षण व इतर अनेक महत्वाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यामुळे ही उपकरणे सुरक्षित असणे अतिशय महत्वाचे आहे.
मायकोबॅक्टीरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा क्षयरोग जगात मृत्युचे एक प्रमुख कारण आहे. २०१७ साली जगभरात सुमारे १० दशलक्ष लोकांना क्षयरोग झाला आणि त्यापैकी १.६ दशलक्ष रुग्ण दगावले.
बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम जगात सगळीकडे दिसून येत आहेत. अर्थातच, मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेले हिमालयातील नाजुक स्थलतंत्रही यापासून सुरक्षित नाही. सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपुर आणि सोसायटी फॉर कंझर्विंग प्लॅनेट अँड लाइफ, उत्तराखंड येथील संशोधकांनी हिमालयातील बदलत्या हवामानाचा धुरचुक या वनौषधीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.