‘झीन्स’ नावाचे द्विमितीय पदार्थ ताणले असता त्यांच्या आणवीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा संशोधकांनी सैद्धांतिक अभ्यास केला आहे.

Biodiversity International

बेंगलुरू
2 जून 2020

हिवाळा सुरु होताच पंजाबमध्ये भातशेतीच्या हजारो हेक्टर परिसरात काढणी करणारी शेकडो यंत्रे घरघरायला लागतात.  महाराष्ट्रामध्ये विदर्भातील खेड्यांमधून शेतकरी शुभ्र कापूस बाजारात घेऊन जाताना दिसू लागतात. फार वर्षांपूर्वी याच ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेली जंगले, गवताळ प्रदेश व दलदल असे आणि फिरत्या पद्धतीने विविध पिके घेतली जात. पण गेल्या पाच सहा दशकांमध्ये अशा अनेक नैसर्गिक भूप्रदेशाचे रूपांतर एक किंवा दोनच पिके घेतल्या जाणाऱ्या कायमच्या शेतांमध्ये झाले आहे. ह्या शेतीसाठी पाण्यासारखी संसाधने आणि कीटकनाशके व तणनाशके यांच्या रूपात रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.