दाटीवाटीच्या शहरी भागांमधल्या इमारतींच्या छतांवर छोटी झाडे लावल्याने पुराची तीव्रता आणि पाणी वाहून जाण्याचे प्रमाण घटते

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल यांना भारतात शेल वायू साठे शोधण्याच्या कामासाठी नासी तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर

Read time: 1 min
मुंबई
31 डिसेंबर 2018
आरेदथ सिद्धार्थ, नंदिनी भोसले, हसन कुमार गुंडू, कम्युनिकेशन डिझाईन , आयडीसी, आयआयटी मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील भूविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक विक्रम विशाल यांना नुकत्याच त्यांच्या अपारंपरिक हायड्रोकार्बन्सवरील कामासाठी प्रतिष्ठित अश्या नासी तरुण वैज्ञानिक पुरस्कार - २०१८ याने सन्मानित करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, रासायनिक शास्त्र, भौतिक शास्त्र आणि वनस्पती शास्त्रच्या क्षेत्रातील असाधारण संशोधनासाठी वार्षिक पुरस्काराने सन्मानित केले जाणारे ते देशातील 20 संशोधकांपैकी एक आहेत.

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स इंडिया, एनएएसआय, नासी) तर्फे दिल्या  जाणाऱ्या नासी तरुण वैज्ञानिक पुरस्काराद्वारे भारतातील तरुण शास्त्रज्ञांमधील कल्पकता आणि उत्कृष्टता यांचा गौरव केला जातो. या वार्षिक पुरस्कारात एक अवतरण, एक पदक आणि रु. २५,००० रोख पारितोषिक दिले जाते. २००६ पासून, भारतातील १४३ संशोधकांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.

"नासी ही भारतातील सर्वात जुनी वैज्ञानिक अकादमी आहे आणि अनेक इतर पुरस्कारांच्या तुलनेत, तरुण वैज्ञानिक पुरस्कार अत्यंत स्पर्धात्मक आहे कारण पुरस्कार विजेते हे  वेगवेगळ्या ज्ञानशाखांतून येतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे." असे प्राध्यापक विशाल म्हणाले.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने देऊ केलेल्या निधीची मदत असलेले प्राध्यापक विशाल यांचे सध्याचे संशोधन हे भारतातील अपरंपरागत हायड्रोकार्बन साठ्यांवर केंद्रित आहे. अपरंपरागत हायड्रोकार्बन साठ्यांतून तेल आणि वायू काढण्यासाठी हायड्रोकार्बन्सच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. अपरंपरागत हायड्रोकार्बन्समध्ये शेल वायू (विशिष्ट दाणेदार, भेगाळलेल्या दगडां (शेल) मध्ये अडकलेला नैसर्गिक वायू ), शेल तेल, वायू हायड्रेट्स (एखाद्या घन बर्फासारख्या आकारात वायूयुक्त पाणी) आणि कोळशाचे मिथेन यांचा समावेश आहे. भारतातील शेल गॅस संभाव्यतेचे अचूकपणे अंदाज बांधणे हे त्यांच्या कामाचे उद्दिष्ट आहे.

या संशोधनात प्राध्यापक विशाल आणि त्यांचे संशोधक सहकारी यांनी प्रयोगशाळेत हायड्रोकार्बन साठ्यांच्या परिस्थितीचे अनुकरण केले. गोळा केलेल्या शेलच्या नमुन्यांवर तापमान आणि दाबाचा अभ्यास करून त्या निरीक्षणांवर आधारित गॅस च्या उपलभ्यतेचा अंदाज ते वर्तवू शकतात. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्याच्या पद्धतींने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा  २५-३०% अधिक जास्त वायू मिळवता येऊ शकतो.

२०१७ मध्ये आयएनएसए तरुण वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त करणारे प्राध्यापक विशाल असे सांगतात की, "सध्या भारतात शेल गॅसच्या हनुमानाला क्षेत्र परीक्षण किंवा प्रयोगांचा आधार नाही अँड ही अनुमाने प्रमाणातही नाहीत.  गहन अभ्यास करूनच याचे शेल गॅसच्या उबलभ्यतेचे अनुमान लावणे शक्य आहे." विशिष्ट तंत्रज्ञान आणि कौशल्य यांच्या संयोगामुळे आपल्याला  अपारंपरिक तेल आणि वायू स्रोत समजण्यास मदत होईल.

"शेल वायू आणि वायू हायड्रेटसारख्या अपारंपरिक हायड्रोकार्बन साठे शोधण्याचा भारत सरकारचा अलीकडचा प्रयत्न आणि माझे या विषयातील ज्ञान आणि कौशल्य वापरण्यासाठी चांगली संधी आहे. एक शास्त्रज्ञ म्हणून, भारतातील संभाव्य खोऱ्यांमधून नमुने गोळा करण्याचा आणि नैसर्गिक गॅस च्या भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून उपलभ्यतेचा अंदाज बांधण्याच्या माझ्या कामाचा पायाच जणू यातून घातला गेला. या साठ्याचा अगदी थोडा भाग देखील शतकांसाठी देशाला उपयोगी पडू शकतात." असे प्रा. विशाल सांगतात. त्यांचे हे संशोधन पुढील पाच वर्षात तेल आयात कमी करण्याची आणि २०२२ पर्यंत नैसर्गिक वायूत देशाचे योगदान १५ टक्क्यांनी वाढवण्याच्या  देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करेल.