संशोधकांनी महासंगणकांच्या शीतनासाठी तांब्याऐवजी सिरॅमिक-आधारित शीत-पट्टक तयार केले, ज्यामुळे लहान व आटोपशीर आकाराचे सर्किट बोर्ड शक्य होतील.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संशोधन गटाला होमियोपॅथिक औषधे आणि त्यांचे नॅनो टेक्नॉलॉजीशी संबंध यातील अभ्यासासाठी आयुष पुरस्कार

Read time: 1 min
मुंबई
26 फेब्रुवारी 2019
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संशोधन गटाला होमियोपॅथिक औषधे आणि त्यांचे नॅनो टेक्नॉलॉजीशी संबंध यातील अभ्यासासाठी आयुष पुरस्कार

केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् (सीसीआरएएस) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयुष पुरस्कारांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील एका गटाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् ही आयुष  (आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.

भारताचे उपराष्ट्रपती श्री व्यंकैया नायडू यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक जयेश बेल्लारे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. जागतिक होमियोपॅथी दिवस साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्याच कार्यक्रमात प्राध्यापक बेल्लारे यांचे विद्यार्थी प्रशांत चिक्रमाने यांना होमियोपॅथीक औषधांना वैज्ञानिक आधार देण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल आयुष तरुण वैज्ञानिक पुरस्कार देण्यात आला. दोन्ही पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र, स्मृति चिन्ह आणि रोख पुरस्कार यांचा समावेश आहे.

नॅनोटेक्नोलॉजीच्या क्षेत्रामध्ये होमिओपॅथिक उपायांच्या पद्धती आणि नॅनो कणांचा जैविक प्रभाव यातील व्यापक अभ्यासाचा या पुरस्काराच्या स्वरूपात गौरव करण्यात आला. दोन पुरसकर्त्यांसह संशोधन गटात प्रा. ए. के. सुरेश, डॉ. एस. जी. केणे, डॉ. मयूर तेमगीर, अभिरुप बसू, नेहा, नीलाक्षी, ध्रुव आणि इतरांचा समावेश आहे.

पुरसकर्त्यांचें  योगदान

गेल्या दशकापासून भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईमधील या गटाच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की नॅनोकणांद्वारे होणारे औषध वितरण कार्यक्षम आहे तसेच अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये देखील महत्त्वपूर्ण आहे. अॅलोपॅथीतील नॅनो-जीवशास्त्राच्या वापरावर अशाच एका संशोधनानुसार, प्रा. बेल्लारे आणि त्यांचे सहकारी (कलिता, शोम, होनवार आणि इतर) यांनी कार्बोप्लाटिन (सामान्यत: डिम्बग्रंथि कर्करोगाचा उपचार करण्यासाठी वापरली जाणारे औषध) नॅनोपार्टिकल्स वापरून मनुष्याच्या डोळ्याच्या रेटिनापर्यंत किती पटकन पोचू शकतो हे दाखवून दिले. त्यांचे हे काम रेटिनल ट्यूमर (रेटिनोब्लास्टोमा) चा उपचार करण्यासाठी नवीन औषधे बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

आपल्या संशोधनाची व्याप्ती पर्यायी औषध पध्दतींसाठी वाढवत प्राध्यापक बेल्लारे यांच्या नेतृत्वाखालील या संशोधन गटाने आयुर्वेदिय भस्मांमध्ये नॅनोटेक्नॉलॉजी हा मुख्य घटक दर्शविला आहे आणि भस्मांमध्ये जीवशास्त्रीयदृष्ट्या अधिक सक्रिय असलेले नॅनो-कण उपस्थित असल्याचे दर्शविले आहे.

होमिओपॅथीच्या क्षेत्रात त्यांचे निष्कर्ष लागू करण्यास उत्सुक प्रा. बेल्लारे यांच्या संशोधन गटाने होमिओपॅथिक औषधांमधील नॅनोकणांची उपस्थिती दर्शविण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा वापर केला. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष कोणत्याही गूढ ऊर्जा किंवा अदभुत शक्तीच्या आधार शिवाय, उपचाराच्या परिणामांसाठी भौतिक आधार देतात. पाच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये  प्रकाशित पेपर्सच्या मालिकेमध्ये त्यांनी असे दाखवून दिले आहे की होमियोपॅथिक औषधे तयार करण्यासाठी औषध कितीही विरळ प्रमाणात वापरले असले तरी नॅनोकणांच्या स्वरूपात मूळ औषध त्यात आढळते. त्यांनी असेही दाखवून दिले आहे की या औषधेंचे प्रमाण जरी सूक्ष्म असले तरी ते मोजण्यायोग्य आहे.

प्राध्यापक बेल्लारे यांच्या गटाने हे सिद्ध केले की होमियोपॅथिक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिलिका कोटिंगचा उपयोग औषधाचे नियंत्रित वितरण करण्यासाठी होतो. नियंत्रित औषध वितरण अलीकडील खूपशा औषधोपचार पद्धतीत व्यापकपणे वापरले जाते. संशोधकांनी नॅनोकणांच्या निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास केला आहे व ते कसे तयार होतात, स्थिरावतात आणि टिकून राहतात यावर अभियांत्रिकी दृष्टीकोन प्रदान केला आहे. हे नॅनोकण पेशींना दिले गेले असता ते जीवशास्त्रीय उत्तेजक आहेत असे दिसून आले. म्हणजेच  या प्रतिसादाला आपण हार्मेटिक किंवा बायफेसिक म्हणू शकतो. यात लहान मात्रा उत्तेजित करणारी असते  तर मोठी मात्रा अवरोध करते.

प्रा. बेल्लारे यांच्या प्रयोगशाळेतील संशोधनाचा जागतिक स्तरावर व्यापक प्रभाव दिसून येतो आहे. अश्या मूलभूत संशोधनाचा वैद्यकीय क्षेत्रावर आणि औषधीनिर्माण आणि त्याचे नियमन यावर काय प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अभ्यासक आणि नियामक इतरही यादृच्छिक चिकित्सा विश्लेषणांचा अभ्यास करायला प्रेरित होत आहेत.