दोन भिन्न विद्युतरासायनिक तंत्रांचा एकत्रित उपयोग करून संशोधकांनी औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या धातूवरील कोटिंग्जचा ऱ्हास किती वेगाने होतो याचे प्रभावीपणे मूल्यांकन केले.
Deep-dive
आपत्ती ससज्जता आणि आर्थिक संरक्षणाची दिशा देण्यासाठी राज्याच्या अर्थ नियोजनावर आपत्तीच्या परिणामाचे मूल्यांकन करायला संशोधकांनी डिसास्टर इंटेन्सिटी इंडेक्स (आपत्ती तीव्रता निर्देशांक) वापरला.
प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना त्यांच्या कार्यासाठी टाटा ट्रान्सफॉर्मॅशन पुरस्काराने २०२४ डिसेंबर मध्ये गौरवण्यात आले.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी असे जीवाणू शोधले आहेत जे मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे उप-उत्पादनाच्या स्वरूपात तयार करतात.
प्राण्यांच्या मार्गक्रमणाचे अनुकरण करणारा रोबोट वापरून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी प्राणी अचूकपणे त्यांच्या घरी कसे पोहचतात याचा अभ्यास केला.
एका नवीन संशोधनानुसार सौराष्ट्रातील खोऱ्यांमधल्या गाळात सापडलेली खनिजे कोणत्या काळातील आहेत ते शोधले, ज्यामुळे प्राचीन नद्यांचे मार्ग आणि भारतीय भूखंडाचा भूवैज्ञानिक इतिहास उलगडला
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरच्या जड वाहनांच्या प्रदूषणावर अभ्यास करून वाहन प्रदूषणावर कडक धोरणे असण्याची गरज अधोरेखित केली.
प्रस्तावित पद्धतीद्वारे वाहनांमधील रेडिएटरचा आवश्यक आदर्श आकार निश्चित करून फ्यूएल सेलवरील वाहनांचे वजन, किंमत आणि अंतराचा आवाका यांची सर्वोत्तम सांगड घालणे शक्य होते.
संशोधकांनी महासंगणकांच्या शीतनासाठी तांब्याऐवजी सिरॅमिक-आधारित शीत-पट्टक तयार केले, ज्यामुळे लहान व आटोपशीर आकाराचे सर्किट बोर्ड शक्य होतील.
संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.