नवीन वर्ष सुरू झाले असले तरी २०१८ मधील आठवणींमधून बाहेर पडायला वेळ लागणारच! २०१८ मधला आमचा महत्वाचा खटाटोप म्हणजे प्रादेशिक भाषांमधून सुरू केलेले विज्ञानसंबंधी प्रसारण. परकीय भाषेचे बंधन झुगारून लक्षवेधक विज्ञान कथा आता आपल्या भाषेत सर्व दूर पोचू शकतील. कानडी भाषेपासून सुरुवात करत हिन्दी, मराठी आणि आसामी मध्येही साहित्य सादर करत आम्ही मोठी उडी मारली आहे. २०१९ साल आश्वासक दिसतंय आणि हा प्रयत्न वृद्धिंगत करण्यास आम्ही आतुर आहोत. सादर करत आहोत प्रादेशिक भाषांमधील विज्ञानलेखांची एक झलक
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी भारतातील मकराणा संगमरवरापासून बनवलेल्या वास्तू सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने उष्णतेमुळे होणाऱ्या क्षयाचे अनुकरण करणारी एक कार्यपद्धती आणि मापन संबंधीचा एक महत्त्वपूर्ण परस्परसंबंध विकसित केला आहे.
Mumbai/