पर्यावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर, कृषीविषयक सुयोग्य धोरणांचे पर्याय शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचे सर्वेक्षण
पर्यावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर, कृषीविषयक सुयोग्य धोरणांचे पर्याय शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचे सर्वेक्षण
दक्षिण आशिया हा प्रदेश उत्तुंग हिमालय पर्वत आणि अनेक नद्यांनी समृद्ध असा आहे. पण महापूर, दुष्काळ, वादळे आणि अनियमित पाऊस ह्या सारख्या नैसर्गिक आपत्ती येथील जनतेस वेठीस धरतात. त्रिभुज प्रदेशात, अर्धशुष्क प्रदेशात तसेच हिमनद्यांच्या खोर्यांमधे रोजचे जीवन निसर्गाच्या अधीन असल्यामुळे अस्थिर असते. लोकांना तग धरून राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात.
जिल्हा पातळीवर केलेल्या एका अभ्यासानुसार जलवायु परिवर्तनामुळे होणार्या अनिश्चित पावसाळ्याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा व विदर्भ क्षेत्रावर पडतो.
भारतीय तंत्रज्ञान संस्था येथील शास्त्रज्ञ म्हणतात तापमानवाढ पवनऊर्जा निर्मितीकरिता लाभदायक असेल