प्राण्यांच्या मार्गक्रमणाचे अनुकरण करणारा रोबोट वापरून आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी प्राणी अचूकपणे त्यांच्या घरी कसे पोहचतात याचा अभ्यास केला.

रीसर्च मॅटर्स चे २०२० मधील लोकप्रिय मराठी लेख

Read time: 1 min
बेंगलुरु
31 डिसेंबर 2020
रीसर्च मॅटर्स चे २०२० मधील लोकप्रिय मराठी लेख

भविष्यात बॅटरी ऐवजी छोटी दहन इंजिन

पेनापेक्षा लहान असलेले, इंधनावर चालणारे छोटेसे दहन इंजिन भविष्यात मोबईल चार्ज करण्यासाठी वापरता येईल. दहन इंजिनात असलेल्या दहनकक्षात उष्णता निर्माण करण्यासाठी एलपीजी, म्हणजे स्वयंपाकाच्या गॅस सारखे इंधन वापरले जाते व निर्माण झालेल्या उष्णतेपासून वीजनिर्मिती केली जाते. नेहमी वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्यांपेक्षा दहन इंजिन जास्त पर्यावरण पूरक असतात.

मशीन लर्निंगच्या आधारे नवीन आौषधांचा जलद शोध

विशिष्ट प्रथिनांना लक्ष्य करणारे औषधीय रेणू तयार करण्यात संप्रेरके महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील शास्त्रज्ञांनी कृत्रिम प्रज्ञा आणि मशीन लर्निंगच्या आधारे नवीन संप्रेरके तयार करण्याची  एक जलद आणि विश्वसनीय पद्धती विकसित केली आहे.

पदार्थांच्या रचनेत दोष उत्पन्न करून संगणकाचा वेग वाढवणे शक्य

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील चमूने षट्कोनी बोरॉन नाइट्राईड मधील दोषांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कामगिरी सुधारण्यासाठी कसा करता येईल त्याचे विश्लेषण केले. काळजीपूर्वक दोष उत्पन्न केलेल्या सामग्रीवर लेसर स्पंदांचा उपयोग केला असता उपकरणाचा वेग निदान हजार पटींनी वाढवता येणे शक्य आहे

डार्क मॅटर वर प्रकाश टाकणार कृष्णविवराची छाया

क्वासी-हॉकिंग इफेक्ट किंवा हॉकिंग विकिरण सदृश परिणाम कृष्णविवराची सावली अत्यंय मंद वेगाने वाढत जाण्यास कारणीभूत असण्याची शक्यता आहे असे संशोधकांना काही निरीक्षणांमध्ये आढळले. संख्यात्मक संगणन व पूर्वी प्रस्थापित केलेली गणितीय समीकरणे वापरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की सावली मोठी होण्याचा अवधी डार्क मॅटरचे गुणधर्म व सावलीचे निरीक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणीच्या वियोजनावर अवलंबून आहे. त्यांची ही पूर्वानुमाने, ह्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या निरीक्षणांसाठी टेम्प्लेट म्हणून वापरता येतील.

शेतांच्या आसपासच्या परिसरातील विपुल जैवविविधतेमुळे शेतीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ

मोठ्या क्षेत्रांमध्ये एकाच प्रकारचे पीक नेहमी घेत असल्यास जैवविविधता कमी होते. ह्याचा शेतीवर कश्या प्रकारे परिणाम होतोय ह्याचे जगाभरातील ८० संस्थांमधल्या सुमारे १०० संशोधकांनी एका अभ्यासात निरीक्षण केले. सजीवांची संपन्नता, आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांच्या व कीडींच्या नैसर्गिक शत्रूंच्या जाति कमी झाल्यास परागीभवनावर परिणाम होतो, कीड नियंत्रण परिणामकारक होत नाही व पिकाचे उत्पादन कमी होते असे त्यांना आढळले.