क्षणोक्षणीचे निरीक्षण व कामाची संदर्भानुरूप विभागणी करणारे नवीन अल्गोरिदम एकत्र काम करणाऱ्या स्वायत्त रोबॉट्सचे आपापसातील सहकार्य सुधारण्यासाठी प्रभावी.

आयआयटी मुंबई मधील शास्त्रज्ञांनी स्मार्टफोनला जोडता येतील अशी छोटी व स्वस्त सूक्ष्मदर्शी भिंगे विकसित  केली आहेत. 

Read time: 1 min

पावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे! हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल! आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस  उर्फ बी.डी.  नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस  नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात.

Read time: 1 min

जगभरातील संशोधक शहरीकरणामुळे जैवविविधतेवर होणार्‍या दुष्प्रभावाबाबत लेख लिहित असतानाच असे लक्षात आले आहे की या शहरीकरणाच्या विळख्यातून पक्षी देखील सुटलेले नाहीत.

Read time: 1 min

शाकभक्षी कीटकांमध्ये वनस्पतींची रचना आणि कार्य प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते. काही शाकभक्षी  कीटक आपल्या जीवनचक्राचा संपूर्ण किंवा काही भाग फक्त विशिष्ट वनस्पतींच्या आधारे पूर्ण करतात. वनस्पती आणि त्यावर जगणारे कीटक यांची लाखो वर्षांपासून समांतर उत्क्रांती होत असल्यामुळे वनस्पतीच्या पानांच्या आकारावर आणि आकृतीवर कीटकांचा प्रभाव दिसून आला आहे. म्हणून कीटक व वनस्पती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेतल्यास वनस्पतींची पानांच्या आकृतिबंधात आणि आकारात इतकी विविधता का आहे ते कळण्यास मदत होईल.

Read time: 1 min

केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् (सीसीआरएएस) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयुष पुरस्कारांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील एका गटाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् ही आयुष  (आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.

Read time: 1 min

संशोधकांनी असे वाहक विकसित केले आहे जे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने अधिक प्रभावीपणे औषध पोहचवू शकते.

Read time: 1 min

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी सेलफोनच्या स्थानाची अचूकता सुधारण्यासाठी आसपासच्या सेलफोनकडून माहिती मिळवणारे ऍप्लिकेशन विकसित केले आहे

Read time: 1 min

पदार्थांचे रेणू ओळखण्यासाठी आय आय टी मुंबई च्या शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन पद्धत 

Read time: 1 min

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर उपलभ्य भूऔष्णिक प्रणालींचा शोध लावला आहे

Read time: 1 min