२०२१ च्या सरतेशेवटी मागे वळून बघताना असे दिसून येते की आपल्या सर्वांना अनेक बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. जग वैश्विक महामारीचा सामना करायला शिकत असताना एक शाश्वत आधार कायम होता आणि राहील. तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. अनेक आघाड्यांवर विज्ञानाची आगेकूच कायम राहिली.आपल्यासाठी रीसर्च मॅटर्स अनेक भारतीय भाषांमध्ये पर्यावरणाचे भान, सामाजिक प्रगती, ऊर्जा, अभियांत्रिकी, सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स मधील नवीन संशोधन आणि बरेच काही या वर्षी घेऊन आले होते. तुम्ही वाचकांनी आम्हाला भरभरून साथ दिली याचा आम्हाला आनंद वाटतो.