नवीन संशोधनाने सिद्ध केले की रंग किंवा शाईच्या वाळलेल्या डागाचा आकार त्यातील कणांच्या आकारमान व प्रमाणावर अवलंबून असते
इंकजेट प्रिंटरसाठी ठराविकच शाई वापरावी असे का बरं सांगितले जाते? कुठला इतर रंग किंवा वेगळी शाई वापरली तर का चालत नसावी? शाई योग्य नसेल तर पूर्ण व एकसमान छ्पाई होत नाही. छापण्यासाठी वापरली जाणारी शाई एक कलिल असते - म्हणजे घनपदार्थाचे बारीक कण द्रव पदार्थात निलंबित असतात. कागदावर एकसमान छापले जावे अश्या रीतीने घन कणांचा आकार व संहती ठरवून शाई तयार केली जाते.