भारताच्या २०३० साठीच्या अक्षय ऊर्जा जनादेशातील उद्दिष्टांच्या पूर्तीचे मार्ग धुंडाळताना संशोधकांनी अतिशय सूक्ष्म स्तरावर काम करणारे वीज निर्मिती व ग्रिड प्रचालन मॉडेल विकसित केले. प्रादेशिक समन्वय आणि लवचिक अनुपालन यंत्रणा महत्त्वपूर्ण असल्याचे या अभ्यासामध्ये दिसून आले, शिवाय निर्धारित ऊर्जा साठवणूक आणि टप्प्याटप्प्याने कोळश्याचा वापर कमी करणे देखील महत्त्वाचे आहे, यामुळे देशात अक्षय उर्जेचा वापर वाढवण्यासाठी लवचिक, परवडण्याजोगा आणि विश्वासार्ह मार्ग मिळू शकेल.
आयआयटी मुंबईद्वारे विकसित नवीन डीप-लर्निंग फ्रेमवर्क SpADANet (स्पाडानेट) मर्यादित लेबल्स वापरूनही अनेक चक्रीवादळांमधील संरचनात्मक नुकसान अधिक अचूकपणे वर्गीकृत करू शकते.
Mumbai/