पार्किनसन्स डिझिझ रुग्णांमध्ये दिसणाऱ्या प्रथिनांचे पुंजके तयार होण्यास कारणीभूत असणाऱ्या रेण्वीय घटना संशोधकांनी शोधल्या
पारकिन्सन्स डिझिझ हा चेतासंस्थेचा एक विकार आहे, ज्यात शारीरीक हालचालींवर नियंत्रण रहात नाही, स्मृतीभ्रंश होतो व हातपाय ताठरतात. आपाल्या मेंदूतील चेतापेशींमधल्या ऍल्फा-सायन्यूक्लीन नावाच्या एका प्रथिनाचे तंतुमय पुंजके तयार झाल्यामुळे हा विकार होतो. मात्र हे पुंजके कशामुळे होतात हे मात्र अजूनही गूढ आहे व ते उलगडण्याच्या प्रयत्नात अनेक संशोधक गुंतलेले आहेत.