संशोधकांनी शोधला आहे जीवाणूंचा नवीन उपप्रकार, जो अन्न म्हणून साखरेपेक्षा प्रदूषकांना प्राधान्य देतो |
संशोधकांनी शोधला आहे जीवाणूंचा नवीन उपप्रकार, जो अन्न म्हणून साखरेपेक्षा प्रदूषकांना प्राधान्य देतो |
बिघडलेल्या हवामानामुळे आणि कामात फारच व्यस्त राहिल्यामुळे, सिक्कीमचा दौरा योजल्याप्रमाणे झालाच नाही. बहुतांश लोकांचा हिरमोड होतो, पण काहींना मात्र काहीतरी खास गवसते! असेच काहीसे बहुमोल, गेल्या वर्षी सिक्कीमला गेलेल्या डॉक्टर बालसुब्रमण्यम कार्तिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या संशोधकांच्या गटाला सापडले. या प्रवासाची सुरुवात झाली सहकारी शास्त्रज्ञांना भेटण्याच्या उद्देशाने, पण सांगता मात्र झाली करंडक वनस्पतींच्या (डायटम) दोन नवीन प्रजाती शोधण्याने!
अधिकारी वर्ग आणि राजकीय हितसंबंध यांच्यामुळे वन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणी मध्ये अडथळे येत आहेत असे अभ्यासात आढळून आले आहे.
काही जातिमधील सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटी यांमुळे त्यांना शिकाऱ्यांपासून बचाव होण्यास मदत होते, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आले.
बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम जगात सगळीकडे दिसून येत आहेत. अर्थातच, मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेले हिमालयातील नाजुक स्थलतंत्रही यापासून सुरक्षित नाही. सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपुर आणि सोसायटी फॉर कंझर्विंग प्लॅनेट अँड लाइफ, उत्तराखंड येथील संशोधकांनी हिमालयातील बदलत्या हवामानाचा धुरचुक या वनौषधीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.
संशोधकांनी शेताचा आकार, सिंचन आणि कुळवहिवाट यासारख्या घटकांचा कापूस शेतीत वापरल्या जाणार्या कीटनाशकासाठी केलेल्या खर्चावर काय प्रभाव होतो याचा अभ्यास केला
पावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे! हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल! आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस उर्फ बी.डी. नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात.
जगभरातील संशोधक शहरीकरणामुळे जैवविविधतेवर होणार्या दुष्प्रभावाबाबत लेख लिहित असतानाच असे लक्षात आले आहे की या शहरीकरणाच्या विळख्यातून पक्षी देखील सुटलेले नाहीत.
शाकभक्षी कीटकांमध्ये वनस्पतींची रचना आणि कार्य प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते. काही शाकभक्षी कीटक आपल्या जीवनचक्राचा संपूर्ण किंवा काही भाग फक्त विशिष्ट वनस्पतींच्या आधारे पूर्ण करतात. वनस्पती आणि त्यावर जगणारे कीटक यांची लाखो वर्षांपासून समांतर उत्क्रांती होत असल्यामुळे वनस्पतीच्या पानांच्या आकारावर आणि आकृतीवर कीटकांचा प्रभाव दिसून आला आहे. म्हणून कीटक व वनस्पती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेतल्यास वनस्पतींची पानांच्या आकृतिबंधात आणि आकारात इतकी विविधता का आहे ते कळण्यास मदत होईल.
महामार्गावर वेगाने गाडी चालवत जाताना धम्माल येते, हो ना? पण महामार्ग जेव्हा प्राण्यांना जीवघेणे ठरतात तेव्हा? रस्त्यावर झालेले प्राण्यांचे मृत्यू लवकरच विस्मृतीत जातात, आणि नवीन मृत्यू होतात तेव्हाच परत उजेडात येतात, जंगलांमधून व अभयारण्यांतून लोक निष्काळजीपणे वाहने चालवतात आणि निर्लज्जपणे परिस्थितिकीचा ऱ्हास होईल अश्या कृती करत राहतात. ही खचितच गमतीची गोष्ट नाही.