सरपटणाऱ्या प्राण्यांचा व बेडकांचा अभ्यास करणाऱ्यांना म्हणजेच उभयसृपशास्त्रज्ञांना २०१८ चे वर्ष प्रोत्साहित करणारे होते कारण मंडूक व पालीच्या २० नवीन जाति इथे सापडल्या. २०१९ सुरू होत असताना हेच सत्र चालू ठेवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, कोलकाता येथील शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात असलेल्या उत्तरेकडील पश्चिम घाटांत किरकिऱ्या बेडकाची (क्रिकेट फ्रॉग) एक नवीन जाति शोधली आहे.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/